Facebook SDK

केस वाढवण्याचे घरगुती उपाय | Kes Vadhavnyache Gharguti Upay | केस वाढवण्याचे घरेलू उपाय


Kes Vadhavnyache Gharguti Upay | केस वाढवण्याचे घरगुती उपाय | केस वाढवण्याचे घरेलू उपाय
Kes Vadhavnyache Gharguti Upay | केस वाढवण्याचे घरगुती उपाय | केस वाढवण्याचे घरेलू उपाय

Kes Vadhavnyache Gharguti Upay (केस वाढवण्याचे घरेलू उपाय): केसगळती ही आजकालची सामान्य समस्या झाली असून या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. पण या समस्येवर काही फायदेशीर असे घरगुती उपाय आहेत. या उपायांमुळे केसगळती कमी होऊन केस पुन्हा वाढण्यास मदत होईल. हे सर्व पदार्थ आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. त्यामुळे आपण ते सहज आजमावू शकतो. तर पाहुया कोणते आहेत हे उपाय...

हे पण वाचा: केस गळतीवर उपाय


केस वाढवण्याचे घरेलू उपाय आणि खोबरेल तेल
खोबरेल तेल हलके गरम करा आणि केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस स्वस्थ आणि मजबूत होतात.

केस वाढवण्याचे घरगुती उपाय आणि एरंडेल तेल
टक्कल पडण्यावर एरंडेल तेल हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे नवीन केस येण्यास मदत होते. त्याचबरोबर डोक्यावर त्वचा (स्कॉल्फ) चे इंफेक्शनपासून संरक्षण होते. 

हे पण वाचा: केस वाढीसाठी उपाय

Kes Vadhavnyache Gharguti Upay आणि दही
दही हे नैसर्गिक कंडीशनर आहे. याच्या वापरामुळे केसांची गळती कमी होते. दह्यातील प्रोटीन्समुळे केसांचे पोषण होते. त्यामुळे दही केसांच्या मुळांशी लावून १५ मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.

केस वाढवण्याचे घरगुती उपाय आणि कोरफड
कोरफडीचा गर केसांना लावल्यास त्याच्यातील इन्जाईम्सने केसांची रोमछिद्र ओपन होतात आणि केसगळती दूर होते.

Kes Vadhavnyache Gharguti Upay आणि काळीमिरी
काळीमिरीची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण केसांना लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा केसांवर हा प्रयोग केल्याने नवे केस येण्यास सुरुवात होते.

हे पण वाचा: केस गळती कशी थांबवावी

केस वाढवण्याचे घरगुती उपाय आणि मध
२ चमचे मध, १ चमचा दालचिनी पावडरमध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करुन केसांना लावा. २० मिनिटांनी केस धुवा.

Kes Vadhavnyache Gharguti Upay आणि लिंबू
१ चमचा लिंबाचा रस २ चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून केसांना लावल्याने फायदा होईल.

केस वाढवण्याचे घरगुती उपाय आणि कांदा
कांद्याचा रस केसांना लावले अत्यंत फायदेशीर ठरते. कांद्याच्या रसामुळे केसांतील बॅक्टेरीया आणि फंगस नष्ट होते. कांद्याचे तुकडे करुन केसांवर १२-१५ मिनिटे घासल्यास केस लवकर येण्यास मदत होईल.

Kes Vadhavnyache Gharguti Upay आणि कापूर
कापूरमुळे केसांतील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि डोक्याला थंडावा मिळतो. अर्धा लिटर खोबरेल तेलात १० ग्रॅम कापूर मिसळून केसांना नियमित लावल्यास केस वाढू लागतात.

केस वाढवण्याचे घरगुती उपाय आणि मेथी
मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बनवा. ती पेस्ट स्कॉल्फवर लावा. तासाभराने केस धुवा. हा प्रयोग रोज केल्यास केस पुन्हा वाढीस लागतील.

हे पण वाचा: केसांच्या वाढीसाठी 15 घरगुती टिप्स

Post a Comment

If you have any problem you can tell in the comments
I can only post this on the problem you have. Let me just comment

थोडे नवीन जरा जुने