Facebook SDK

Home Remedies to Make Your Hair Grow in Marathi: केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

Home Remedies for Long Hair in Marathi
Home Remedies for Long Hair in Marathi 

Home Remedies for Long Hair in Marathi:आपले केस लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो तर कधी पार्लरमध्ये जाऊन महाग पॅकेज खरेदी करतो. पण त्यानंतरसुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतातच असं नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, हे सर्व न करताही केस लांब करता येऊ शकतात तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. आपल्या घरीच असे काही उपाय आहेत, ज्यामुळे केस महिनाभरात लांबसडक वाढण्यास मदत होते. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य घरगुती उपाय करण्याची गरज आहे. हे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ते तुम्ही घरच्याघरी नक्की करून पाहा.




Home Remedies for Long Hair in Marathi 

सर्वात पहिल्यांदा केस न वाढण्याचं अथवा केस गळतीचं नक्की काय कारण आहे ते जाणून घ्या (Causes Of Hair Loss)


1. आपल्या रोजच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात ताणतणाव असल्यामुळे केस गळती आणि केस न वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे.


2. औषधांचं अधिक सेवन हेदेखील केस न वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. याचे बरेच दुष्परिणाम आहेत, जे सर्वात पहिल्यांदा आपल्या केसांवर होत असतात आणि त्यामुळेच केसगळती जास्त प्रमाणात सुरु होते.


3. आपलं डाएट बऱ्याच अंशी केसांची वाढ होण्यासाठी मदत करत असतं. पण खाण्यामध्ये फास्ट फूड आणि आरोग्याला अपायकारक असं खाणं जास्त प्रमाणात खात राहिल्यास, केसगळती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोषक आहाराची मात्रा वाढवा.




4. केसांमध्ये अधिक केमिकलचा वापर केल्यासदेखील केसगळती जास्त प्रमाणात होते. आपण बऱ्याचदा केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स करण्यासाठी त्यावर जेलचा वापर करत असतो. त्यामुळे केसगळतीमध्ये वाढ होते.


हे पण वाचा: केस पांढरे होण्याची कारणे


केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies Long Hair In marathi)


केस वाढवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण घरातल्या घरात अनेक उपाय करून केसांची वाढ करू शकतो. पाहूया असे घरगुती उपाय -



1. केसांच्या वाढीसाठी बायोटिन्स (Biotin for Hair Growth)

काय गरेजेचं आहे

2-3 बायोटिन्सच्या गोळ्या

ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाचं तेल
तुम्ही काय करायला हवं?

गोळ्यांची पावडर करून घ्या आणि असलेल्या तेलामध्ये मिक्स करा

हे मिक्स केलेलं मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांपासून लावा आणि रात्रभर हे तसंच लावून ठेवा
सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे तुमचे केस धुऊन टाका
किती वेळा करू शकता?

आठवड्यातून दोन वेळा तुमच्या केसांवर हा प्रयोग तुम्ही करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?
बायोटिन्समध्ये हिरव्या पालेभाज्यांमधील विटामिन बी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे केसगळती थांबवण्यासाठी याची मदत होते. याचा वापर केल्यामुळे तुमचे केस अधिक जाड आणि निरोगी होतात. तसंच केसगळतीची समस्या असल्यास, निघून जाते.



2. केसांच्या वाढीसाठी विटामिन्स (Vitamin for Hair Growth)

home-remedies-for-hair-growth-in-marathi

बायोटिन्स हा विटामिन्सचा एक प्रकार आहे, ज्यामुळे केसगळती थांबते अशीच अनेक विटामिन्स आहेत ज्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होते. तुमच्या केसांचा निरोगीपणा जपण्यासाठी ही विटामिन्स मदत करतात. तुमच्या केसांचा ताण विटामिन्स ई कमी करण्यासाठी मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विटामिन ई मुळे केसांवर खूप चांगला परिणाम होतो. इतकंच नाही तर हे ट्रॉपिकल लाईफ सायन्सेस रिसर्च जर्नलने केलेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे. दुसरं विटामिन जे केसांसाठी सर्वात चांगलं काम करतं ते म्हणजे विटामिन सी. केसांच्या मुळांमध्ये होत असणारे डेड सेल्स संपवण्याचं काम हे विटामिन सी करतं. यामुळेदेखील केसांच्या वाढीला मदत होते. तर विटामिन्स सी च्या गोळ्या घेतल्यामुळे केसांचे मूळ मजबूत होण्यास मदत मिळते.



3. केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस (Onion Juice)

home-remedies-for-hair-growth-in-marathi

काय गरेजेचं आहे

2 लाल कांदे
कापूस
तुम्ही काय करायला हवं?

कांदे व्यवस्थित कापून घ्या

कापलेल्या कांद्याचा मिक्सरमधून ज्युस काढून घ्या
अतिशय काळजीपूर्वक कांद्याचा रस तुमच्या केसांना मुळापासून लावा तेही कापसाच्या सहाय्याने. अजिबात केसावर रस थापू नका आणि साधारण 15 मिनिट्स लावून ठेऊन द्या
शँपूने त्यानंतर केस धुवा
किती वेळा करू शकता?

याचा निकाल नक्की कसा लागतोय ते पाहून आठवड्यातून एक वेळ तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.

याचा उपयोग कसा होतो?
कांद्याच्या रसामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या वाढीला वेग येतो. केस वाढवण्यासाठी हा सर्वात जुना आणि अगदी योग्य उपाय आहे.

हे पण वाचा: केस पांढरे होण्याची कारणे


4. केसांच्या वाढीसाठी कोरफड जेल (Aloe-Vera Gel)

home-remedies-for-hair-growth-in-marathi

काय गरेजेचं आहे

कोरफड
तुम्ही काय करायला हवं?

कोरफड फाडून घेतल्यानंतर त्यातील जेल काढा

त्यातील जेल तुमच्या केसांना मुळापासून लावा
एक तास हे असंच राहू द्या आणि नंतर शँपूने तुमचे केस धुवा
किती वेळा करू शकता?

आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता.

याचा उपयोग कसा होतो?
तुमच्या मुळातील डेड सेल्स काढून टाकण्यात कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफडीमध्ये केसांसाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात आणि त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

5. केसांच्या वाढीसाठी मध (Honey For Hair Growth)

home-remedies-for-hair-growth-in-marathi

काय गरेजेचं आहे

1 चमचा मध
2 चमचे शँपू
तुम्ही काय करायला हवं?

मध आणि शँपू एकत्र करून घ्या आणि तुमचे केस नेहमीप्रमाणे धुवा

किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हे करा
याचा उपयोग कसा होतो?
तुमचे केस बळकट आणि मजबूत होण्यासाठी मध हा चांगला पर्याय आहे. तुमच्या केसांना पोषक तत्व मधामुळे मिळतात. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या केसांना हानी पोहचवण्यापासून संरक्षण देतात.

हे पण वाचा: 7 Hair Care Oil Home Remedies in Hindi


6. केसांच्या वाढीसाठी चहा पावडर (Tea Powder)

home-remedies-for-hair-growth-in-marathi

काय गरेजेचं आहे

1 ग्रीन टी बॅग
2 कप गरम पाणी
तुम्ही काय करायला हवं?

गरम पाण्यामध्ये 7-8 मिनिट्स ग्रीन टी बॅग ठेऊन द्या

हे पाणी तुमच्या केसांना मुळांपासून लावा
एका तासासाठी केस तसेच ठेवा
गार पाण्याने केस धुवा
किती वेळा करू शकता?

जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुणार असाल तेव्हा तुम्ही हे करू शकता

याचा उपयोग कसा होतो?
केसगळती थांबवण्यासाठी ग्रीन टीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. शिवाय बऱ्याच हर्बल टी मध्ये तुमच्या केसांच्या वाढीसाठी असणारी पोषक तत्व असतात. याचा परिणाम केसांवर खूप चांगला आणि सकारात्मक होतो. यासाठी तुम्ही बँबू टी, नेटल टी, सेज टी अथवा नेहमीच्या वापरातील चहा पावडरचादेखील उपयोग करू शकता.

7. केसांच्या वाढीसाठी मेंदी (Henna For Hair Growth)


काय गरेजेचं आहे

1 कप कोरडी मेंदी
अर्धा कप दही
तुम्ही काय करायला हवं?

मेंदी आणि दही एकत्र करून भिजवून घ्या

तुमच्या केसांच्या मुळांपासून हे मिश्रण लावा
हे मिश्रण सुकेपर्यंत तसंच केसांमध्ये राहू द्या
नंतर शँपूने धुवा
किती वेळा करू शकता?

महिन्यातून एकदा तुमच्या केसांना मेंदी लावा

याचा उपयोग कसा होतो?
नैसर्गिक कंडिशनर म्हणून मेंदीचा वापर होतो शिवाय मेंदीमुळे तुमचे कोरडे केस मऊ मुलायम होतात. त्याशिवाय तुमच्या केसांना एक वेगळा रंगही मेंदीमुळे येतो. तुमच्या केसांचे मूळ मेंदीमुळे चांगले राहते.

हे पण वाचा: Hair Fall Pack in Hindi for Woman And Male


8. केसांच्या वाढीसाठी अंडे (Egg For Hair Growth)

home-remedies-for-hair-growth-in-marathi

काय गरेजेचं आहे

1 अंडे
1 चमचा ऑलिव्ह ऑईल
1 चमचा मध
तुम्ही काय करायला हवं?

एका भांड्यात अंडं फोडा आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑईल आणि मध मिक्स करा

नीट मिक्स करून त्याची पेस्ट बनवा
काळजीपूर्वक तुमच्या केसांना हे मिश्रण लावा. साधारणतः 20 मिनिट्स हे तसंच केसांना लावून ठेवा
थंड पाण्याने शँपू लावून केस धुवा
किती वेळा करू शकता?

लांब आणि चमकदार केसांसाठी आठवड्यातून एकदा हे नक्की करा

याचा उपयोग कसा होतो?
अंड्यामध्ये प्रोटीन्स, सल्फर, झिंक, लोह, सिलेनियम, फॉस्फरस आणि आयोडिन या सर्व गोष्टी असतात. केसांच्या वाढीसाठी अंड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात. नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यासाठी अंडं हे उपयुक्त असून हे चांगल्या प्रकारे केसांना मॉईस्चराईज करून पोषण देतं. यामध्ये विटामिन ए, ई आणि डी असल्यामुळे केसगळती थांबते. तुमच्या केसांचं टेक्स्चर चांगलं होतं आणि तुमच्या केसांना चमक मिळते.

हे पण वाचा: केस वाढीचे घरगुती उपाय


9. केसांच्या वाढीसाठी हळद (Turmeric)

hair-growth-tips-in-marathi

काय गरेजेचं आहे

3-4 चमचे हळद पावडर
एक कप कच्चं दूध
2 चमचे मध
तुम्ही काय करायला हवं?

दुधामध्ये हळद आणि मध मिक्स करून घ्या

हे तुम्ही तुमच्या केसांना लावा
साधारण अर्धा तास तसंच ठेवा. नंतर शँपू आणि कोमट पाण्याने केस धुवा
किती वेळा करू शकता?

आठवड्यातून एक वा दोन वेळा हे करून पाहा

याचा उपयोग कसा होतो?
हळद ही बऱ्याच आजारांवरही गुणकारी असते. त्याचप्रमाणे केसांसाठीदेखील गुणाकारी आहे. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे तुमच्या केसांची त्वचा चांगली राहते आणि यामधील अँटीऑक्सिडंट, अँटीसेप्टीक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे केसांची वाढ चांगली होते.

हे पण वाचा: Hair Fall Home Remedies in Marathi


10. ऑलिव्ह ऑईलने होतील केस लांबसडक (Olive Oil)

olive oil

काय गरजेचं आहे

1 चमचा नारळ तेल,
1 चमचा ऑलिव्ह ऑईल,
1 चमचा मध
एक अंड

तुम्ही काय करायला हवं?

एका वाटीमध्ये 1 चमचा नारळ तेल, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, 1 चमचा मध आणि एक अंड हे सर्व एकत्र करून चांगलं मिश्रण बनवून घ्या.
हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळापासून लावा आणि साधारण एक तासापर्यंत ठेवून द्या.
त्यानंतर केस थंड पाण्याने धुवून घ्या.
हे मिश्रण लावल्यानंतर कधीही गरम पाण्याने धुऊ नये हे कायम लक्षात ठेवा.
किती वेळा करू शकता?

आठवड्यातून एक वा दोन वेळा हे करून पाहा

याचा उपयोग कसा होतो?
गरम पाण्याने धुतल्यास, तुमच्या केसांना अपाय होऊ शकतो. या उपायामुळे तुमचे केस लांबसडक आणि चमकदार होतील. केसांवर याचा चांगला परिणाम होण्यासाठी तुम्ही साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग तुमच्या केसांवर करू शकता. एका महिन्यामध्ये तुमचे केस लांबसडक होण्यास सुरुवात होईल आणि केसांवर सकारात्मक परिणाम दिसेल.

हे पण वाचा: केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय


11. Apple साईड व्हिनेगरचा करा वापर (Apple Cide Vinegar)apple sider vinegar)


काय गरजेचं आहे

एक अंडे,
दोन ते अडीच चमचे ऑलिव्ह ऑईल,
एक व्हिटामिन ई कॅप्सूल,
एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर
२ थेंब इसेन्शियल ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवून घ्या.
इसेन्शियल ऑईल हे अंड आणि Apple सायडर व्हिनेगरचा वास कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता.
ही पेस्ट तुम्ही केसांच्या मुळांपासून लावा
आणि एक तासानंतर शॅम्पूने केस धुवा.
केस धुतल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही कंडिशनरचादेखील वापर करू शकता.
किती वेळा करू शकता?

15 दिवसातून एक वेळा तुम्ही केसांवर ही पेस्ट लावू शकता.


याचा उपयोग कसा होतो?

Apple साईड व्हिनेगरमध्ये केसांना आवश्यक असणारे पोषक तत्व असतात. जे मुळापासून लावल्यामुळे केस अधिक चमकदार आणि घनदाट होण्यास मदत होते.

हे पण वाचा: Hair care tips at home in marathi


12. केळं आहे फायदेशीर (Banana)


काय गरजेचं आहे

मध्यम आकाराचा अव्हॅकॅडो
एक छोटं केळं
तुम्ही काय करायला हवं?

वरील दोन्ही वस्तू मॅश करून घ्या.

आता त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि व्हिट जर्म ऑईल मिक्स करा.
हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना लावून केसांना हलक्या हाताने मसाज करा आणि साधारणतः अर्धा तास केस तसेच ठेवा.
त्यानंतर केस शॅम्पू लावून थंड पाण्याने धुवा.
किती वेळा करू शकता?

असं आठवड्यातून तुम्ही दोन वेळा केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.

याचा उपयोग कसा होतो?
केळं आणि अव्हॅकॅडो तुमच्या केसांना मजबूती देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही किमान पंधरा दिवसातून याचा उपयोग केल्यास, तुमच्या केसांना याचा फायदा होतो.

13. आवळा आहे रामबाण उपाय (Amla)


काय गरजेचं आहे

एक चमचा आवळ्याचा रस,
1 चमचा शिकाकाई पावडर,
2 चमचे नारळाचे तेल
तुम्ही काय करायला हवं?

एका भांड्यात एक चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकाकाई पावडर, 2 चमचे नारळाचे तेल हे सर्व एकत्र घालून उकळून घ्या.

थोडं थंड झाल्यानंतर आपल्या केसांवर लावून मसाज करा.
रात्री झोपण्यापूर्वी हे करा आणि सकाळी तुमचे केस शँपूने धुवा.
किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?
आवळा हे केसांसाठी नैसर्गिक औषध आहे. यातील गुणधर्म तुमच्या केसांना अधिक सुंदर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे याचा नियमित वापर केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.

हे पण वाचा: केस वाढवण्याचे घरगुती उपाय

14. ग्लिसरीन (Glycerin)


काय गरजेचं आहे

केळं
नारळ तेल
ग्लिसरीन
मध
तुम्ही काय करायला हवं?

तुमचे केस जर कोरडे आणि डॅमेज असतील तर एका केळ्यामध्ये 4 चमचे नारळाचे तेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 2 चमचा मध घालून त्यामध्ये मिक्स करून घ्या.

आता हे मिक्स्चर केसांना लावा
मग शॉवर कॅपच्या सहाय्याने केस कव्हर करून घ्या. काही आठवड्यातच तुमचे केस चमकदार होतील. 
किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?
नारळाचं तेल आणि ग्लिसरीन हे कॉम्बिनेशन केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं. त्यामुळे हे मिश्रण तुमच्या केसांमध्ये मुरून तुमच्या केसांना अधिक घनदाट बनवतं

15. मध आणि ऑलिव्ह ऑईलची कमाल (Honey and Olive Oil)


काय गरजेचं आहे
मध
ऑलिव्ह ऑईल
तुम्ही काय करायला हवं?

एका बाऊलमध्ये अर्धा कप मध घ्या

आणि त्यामध्ये 4 चमचे ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा.
आता हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरून ठेवा.
हे कंडिशनर आता केसांना लावा आणि 30 ते 40 मिनट्ससाठी शॉवर कॅप घालून ठेवून द्या. त्यानंतर केस नीट धुवून घ्या.
किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?
मध आणि ऑलिव्ह ऑईल केसांना उपयुक्त पोषण देतं. त्यामुळे तुम्हाला केस घनदाट होण्यासाठी याचा फायदा होतो. ऑलिव्ह ऑईल केसांमध्ये मुरतं.

16. नाशपातीचा करून घ्या उपयोग (Nashpati)


काय गरजेचं आहे

नाशपाती
पाणी
ऑलिव्ह ऑईल
मलई
तुम्ही काय करायला हवं?

एक नाशपाती घेऊन पेस्ट बनवा.

आता या पेस्टमध्ये 2 चमचे पाणी, 3 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 2 चमचे मलई घालून थोडं घट्ट मिश्रण तयार करा.
आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावून 20 ते 30 मिनिट्स लाऊन ठेवा आणि शॉवर कॅपच्या मदतीने केस झाकून ठेवा.
त्यानंतर केसांना साध्या पाण्याने धुवा.
किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.

याचा उपयोग कसा होतो?
नाशपतीमध्ये केसांची चमक वाढवण्याची मात्रा जास्त असते. त्यामुळे केस चमकदार होतात(hair-growth-tips-in-marathi)


17. कडिलिंबाची कमाल (Lime Leaves)


काय गरजेचं आहे

कडिलिंब
पाणी
तुम्ही काय करायला हवं

कडिलिंबाची काही पानं घेऊन 4 कप पाण्यात घालून उकळून घ्या.

त्यानंतर ही पानं थंड झाल्यावर काढून घ्या.
आता जे पाणी शिल्लक राहिलं आहे त्याने केस धुवावे. त्यामुळे केस लवकर वाढतील.
किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.

याचा उपयोग कसा होतो?
कडिलिंबामध्ये केसांना घनदाट बनवण्याची नैसर्गिक क्षमता असते. तुमच्या केसांमधील धूळ आणि प्रदूषणाचा प्रभाव यामुळे कमी होऊन केस वाढण्यास मदत होते.

18. कडिपत्तादेखील करतं काम (Curry Leaves)


काय गरजेचं आहे

कढीपत्ता
लिंबाचं साल
नट पावडर
हिरवे चणे
मेथी दाणे
तुम्ही काय करायला हवं

15 ते 20 कढीपत्ते आणि एका लिंबाची सालं घ्या.

यामध्ये सोप नट पावडर, हिरवे चणे आणि मेथीचे दाणे कुटून घ्या. आता हे मिश्रण केसांना लावा आणि काही वेळाने शँपूने धुवून घ्या.
किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.

याचा उपयोग कसा होतो?
कढीपत्त्यांमध्ये नैसर्गिक केसांना पोषण देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे याचा वापर करून  तुम्ही तुमच्या केसांची वाढ झटपट करू शकता.


हे पण वाचा: केस गळती कशी थांबवावी


19. कांद्याच्या बिया (Onion seeds)


काय गरजेचं आहे

कांदा बी
मेथी दाणे
कोरफड जेल
व्हिटामिन ई कॅप्सूल
कॅस्टर ऑईल
तुम्ही काय करायला हवं

3 वाटलेल्या कांद्याच्या बियांमध्ये 3 चमचे वाटलेले मेथीचे दाणे मिसळून घ्या.

आता यामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. यानंतर यामध्ये 1 चमचा कोरफड जेल आणि दोन व्हिटामिन ई कॅप्सूल अथवा कॅस्टर ऑईल घालून मिश्रण करावं.
तुमच्या केसांमध्ये जर कोंड्याची समस्या असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे नारळाचे तेलदेखील घालू शकता.
हे मिश्रण तुम्ही केसांच्या मुळावर लावा.
एक तासाने केस शँपूने धुवा.
किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही पंधरा दिवसातून एकदा करू शता.

याचा उपयोग कसा होतो?
केसांसाठी कांदा हा एक रामबाण उपाय ठरतो. तुमचे केस कांद्याच्या रसामुळे अतिशय मऊ आणि मुलायम तर होतातच शिवाय तुमच्या केसांची वाढ होण्यासाठीदेखील हे उत्तम ठरतं.


हे पण वाचा: Hair Fall Treatment at Home in Marathi  

1 टिप्पण्या

If you have any problem you can tell in the comments
I can only post this on the problem you have. Let me just comment

टिप्पणी पोस्ट करा

If you have any problem you can tell in the comments
I can only post this on the problem you have. Let me just comment

थोडे नवीन जरा जुने