Facebook SDK

Best Hair Growth Oil in India Hair Growth Oil And | Best Hair Growth Oil

Best hair growth oil and shampoohair growth oil,best hair growth oil,best hair growth oil in india,best hair growth oil and shampoo,beardo hair growth oil,fast hair growth oil,best hair growth oil in india,homemade hair growth oil
Best Hair Growth Oil and Shampoo



केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट तेल (Best Hair Growth Oil and Shampoo-Oil for Hair Growth)
तेलाशिवाय केसांची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही असं नेहमीच सांगितलं जातं. पण केसांसाठी कोणतं तेल योग्य आहे हेदेखील जाणून घेणं गरजेचं आहे.

1) केसांच्या वाढीसाठी नारळाचं तेल (indian hair growth Coconut Oil In Marathi)


काय गरजेचं आहे
नारळाचं तेल

तुम्ही काय करायला हवं?
तेल गरम करून तुम्ही त्याने मुळापासून केसांना मसाज करा
दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन घ्या

किती वेळा करू शकता?
तुम्ही केस धुणार असाल त्याच्या आदल्या रात्री नेहमी तेलाचा असा मसाज करून ठेवा. पण आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास केसांवर जास्त चांगला परिणाम होतो.

याचा उपयोग कसा होतो?
नारळाचं तेल हा सर्वात चांगला नैसर्गिक घरगुती उपाय आहे. नारळाचं तेल तुमचे केस मुळापासून चांगलं राखण्यासस मदत करतं. शिवाय केसांमधील कोंडा होण्यासाठी रोख लावतं, केस तुटण्यापासून नारळाचं तेल वाचवतं. नारळाचं तेल म्हणजे केसांसाठी प्रिकंडिशनिंग आहे.

2) केसांच्या वाढीसाठी विटामिन ई तेल (Vitamin-E Oil-hair growth oil)


काय गरेजेचं आहे
7-8 विटामिन ई कॅप्सुल्स

तुम्ही काय करायला हवं?

एका वाटीत काळजीपूर्वक कॅप्सूल फोडून त्यातील तेल काढून घ्या
तुमच्या केसांना मुळापासून या तेलाने मसाज करा
रात्रभर हे तेल केसांना असंच राहू द्या
दुसऱ्या दिवशी मऊ आणि सुंदर केसांसाठी शँपू लावून केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता

याचा उपयोग कसा होतो?
विटामिन ई चा केस वाढवण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून उपयोग होत आहे. विटामिन ई च्या तेलामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्याचा रॅडिकल्सशी लढण्यासाठी उपयोग होतो. तुमच्या शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि तुमच्या केसांतील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासही हे मदत करतं. याचा नियमित वापर केल्यास, हे तेल केसांच्या वाढीसाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी उपयोगी ठरतं. शिवाय तुमचे केस या तेलामुळे अधिक मऊ आणि मुलायम होतात.

3) केसांच्या वाढीसाठी रोझमेरी ऑईल (Rosemary Oil-new hair growth oil)

काय गरेजेचं आहे
1 चमचा रोझमेरी ऑईल
2 चमचे नारळाचं तेल

तुम्ही काय करायला हवं?
एका वाटीत रोझमेरी आणि नारळाचं तेल मिक्स करून घ्या आणि हे मिक्स्चर केसाला मुळापासून लावा
रात्रभर हे असंच केसांना लाऊन ठेवा आणि सकाळी केस धुवा
तुम्ही रोझमेरी ऑईलसह तुमचा शँपू आणि कंडिशनरदेखील मिक्स करू शकता हे लक्षात ठेवा
किती वेळा करू शकता?

चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा रोझमेरी ऑईलचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?
रोझमेरी हर्बपासून हे ऑईल बनवण्यात येतं. या तेलामुळे तुमच्या डोक्यातील नसा विस्तारण्यास मदत होते. शिवाय ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होतं. केस वाढीसाठी आणि केसांना टॉनिक म्हणून हे खूपच उपयुक्त आहे.


4) केसांच्या वाढीसाठी आर्गन ऑईल (Argan Oil-organic hair growth oil)

काय गरेजेचं आहे
तुम्ही काय करायला हवं?
हे तेल घेऊन तुम्ही तुमच्या मुळांपासून लाऊन मसाज करा
एक तास ते तेल मुरण्यासाठी वाट बघा
तुम्ही संपूर्ण रात्रदेखील तेल लाऊन ठेऊ शकता. त्यानंतर आंघोळ करून केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?
मऊ, मुलायम आणि चमकदार केसांसाठी आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग तुम्ही करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?
घट्ट आणि मजबूत घनदाट केसांसाठी आर्गन ऑईल हे एक नैसर्गिक वरदान आहे. याला ‘लिक्विड गोल्ड’ असंही म्हटलं जातं. केसांची वाढ होण्यासाठी हे तेल खूपच उपयुक्त असून केसांना हे चांगलं मॉईस्चराईज करतं. तसंच तुटायला आलेले केसांची हे तेल दुरुस्तीही करतं. केसांमधील नैसर्गिक तेल जपण्याचा प्रयत्न हे ऑईल करतं.


5) केसांच्या वाढीसाठी सेज ऑईल (Sage Oil-ancient secret hair growth oil)

काय गरेजेचं आहे
1 चमचा सेज ऑईल
2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल

तुम्ही काय करायला हवं?
नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात सेज ऑईल मिक्स करा आणि ते तुमच्या केसांना मुळापासून लावा
रात्रभर तसंच ठेऊन सकाळी धुऊन टाका

किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?
निरोगी राहण्यासाठी या ऑईलचा उपयोग होतो. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स केसांची वाढ होण्यासाठी मदत करतात.


6) केसांच्या वाढीसाठी लव्हेंडर ऑईल (Lavender Oil: natural hair growth oil)

काय गरेजेचं आहे
3-4 थेंब लव्हेंडर ऑईल
2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल
शॉवर कॅप

तुम्ही काय करायला हवं?
वरीलपैकी तुमच्या आवडीच्या तेलामध्ये लव्हेंडर ऑईलचे थेंब टाका.
तुमच्या केसाच्या मुळांपासून हे तेल लावा आणि नंतर शॉवर कॅपने केस झाकून टाका
तासाभर हे असंच ठेऊन द्या
तासाभराने तुमचे केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?
तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता
याचा उपयोग कसा होतो?
लव्हेंडर ऑईलची ओळख ब्युटी ऑईल अशी आहे. पण याचा उपयोग केसांच्या वाढीसाठीदेखील होतो. शिवाय कोणताही ताणतणाव असल्यास या तेलाचा वापर केल्यास, त्याचा परिणाम चांगला होतो.


7) केसांच्या वाढीसाठी जोजोबा ऑईल (Jojoba Oil)

काय गरेजेचं आहे
1 चमचा जोजोबा ऑईल
2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल

तुम्ही काय करायला हवं?
एका वाटीमध्ये नारळाचं तेल (अथवा ऑलिव्ह ऑईल) आणि जोजोबा ऑईल मिक्स करून घ्या आणि त्यानंतर
योग्य ब्लेंड करून तुमच्या केसांना लावा
रात्रभर हे केसांना लाऊन ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?
मॉईस्चराईज आणि हायड्रेट करण्यासाठी जोजोबा ऑईलचा उपयोग होतो याची सर्वांनाच माहिती आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी आणि मॉईस्चराईज करण्यासाठी याचा केसांमध्ये चांगला उपयोग होतो. कोरडे आणि हानीकारक केसांना पुन्हा चांगलं बनवण्यासाठी या तेलाचा चांगला उपयोग होतो.

8) केसांच्या वाढीसाठी फ्लॅक्स्ड ऑईल (Flax Seed Oil)

काय गरेजेचं आहे
1 चमचा फ्लॅक्स्ड ऑईल
2 चमचे नारळाचं तेल वा ऑलिव्ह ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

दोन्ही तेल मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित ब्लेंड करून केसांना लावा
रात्रभर तसंच राहू द्या
दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा या तेलाचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?
फॅटी अॅसिडचा फ्लॅक्सच्या बी हा चांगला स्रोत आहे. कोरडे केस मऊ आणि मुलायम करण्यामध्ये या तेलाचा चांगला हातभार लागतो. निरोगी केसांसाठी यामध्ये असलेलं ओमेगा - 3 फॅटी अॅसिड मदत करतं.

9) केसांच्या वाढीसाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)

काय गरेजेचं आहे

नुसतं ऑलिव्ह ऑईल
टॉवेल
गरम पाणी

तुम्ही काय करायला हवं?
तेल गरम करून घ्या आणि त्या तेलाने केसाला मुळापासून मसाज करा
गरम पाण्यात टॉवेल भिजवून घ्या आणि त्यातील जादा पाणी काढून टाका
हा भिजलेला टॉवेल तुमच्या केसांभोवती लपेटून घ्या आणि साधारण 15-20 मिनिट्स ठेवा
त्यानंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन टाका

किती वेळा करू शकता?
हा गरम टॉवेलचा प्रयोग तुम्ही चार ते पाच दिवसांनी एकदा नक्की करा

याचा उपयोग कसा होतो?
केसगळती तशीच केसांची काळजी घेण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा चांगला उपयोग होतो. केसांची नवी वाढ होण्यास यामुळे मदत होते. तुमच्या डीटीएच हार्मोनची काळजी आणि केसांच्या वाढीसाठी हे ऑलिव्ह ऑईल उपयुक्त आहे. तुमचे केस मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याची मदत होते. या तेलामध्ये असणारं अँटीऑक्सिडंट हे तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी उत्कृष्ट आहे.

10) केसांच्या वाढीसाठी कॅस्टर ऑईल (Castor Oil)

काय गरेजेचं आहे

कॅस्टर ऑईल
गरम टॉवेल
तुम्ही काय करायला हवं?

कॅस्टर ऑईल गरम करून घ्या
केसांच्या मुळापासून लाऊन नीट मसाज करा
साधारण 20 मिनिट्ससाठी कोमट टॉवेल तुम्ही तुमच्या केसांना गुंडाळून ठेवा
हे तेल अतिशय तेलकट असल्यामुळे तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रसही घालू शकता. यामुळे तुम्हाला कोंड्याचा त्रास असल्यास, तोदेखील कमी होऊ शकतो.

किती वेळा करू शकता?
चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करू शकता

याचा उपयोग कसा होतो?
तुमचे केस लवकर वाढावे, घनदाट आणि सुंदर व्हावे यासाठी कॅस्टर ऑईलसारखा दुसरा पर्याय नाही. केसांच्या वाढीसाठी हा उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. तुम्हाला टक्कल पडत असेल तर या तेलाचा वापर करा. तुमच्या केसाला हे चांगलं मॉईस्चराईज करतं आणि केसांना फाटे फुटत असतील तर त्यावरही याचा चांगला उपयोग होतो.

11) केसांच्या वाढीसाठी बदाम तेल (Almond Oil)

काय गरेजेचं आहे
तुम्ही काय करायला हवं?
बदामाच्या तेलाने केसांना मुळापासून चांगला मसाज करून घ्या
रात्रभर हे तेल लाऊन ठेऊन द्या आणि सकाळी केस धुवा

किती वेळा करू शकता?
बदामाचं तेल आठवड्यातून दोन वेळा वापरा

याचा उपयोग कसा होतो?
केस आणि मुळांमधील समतोल बदामाचं तेल राखतं. तसंच तुमच्या केसांमध्ये येत असलेली खाज, कोरडेपणा या गोष्टी कमी करण्यास या तेलाचा उपयोग होतो. तुमच्या केसांना मजबूती देण्याचं कामही हे तेल करतं. शिवाय केस चमकदार करण्यासाठी याची मदत होते.

Best shampoo for hair growth in india 

केस वाढवण्यासाठी शँपू (Shampoo for Hair Growth: Nyle shampoo for hair growth)
केसांची काळजी घेण्यासाठी शँपूदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांसाठी नक्की कोणता शँपू वापरायला हवा याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.


best shampoo for hair growth: Aroma Magic Triphla Shampoo
अरोमा मॅजिक त्रिफला शँपूमध्ये तीन वनस्पती असून या पोषक आहेत. या वनस्पतींचा सर्वात जास्त उपयोग घरगुती उपचारांसाठी केला जातो. यामुळे तुमच्या मुळापासून साफ करतात आणि तुमच्या केसांना चांगलं पोषण देऊन मजबूती मिळते. तुमचे केस जर तेलकट असतील आणि दर दोन दिवसांनी जर तुमच्या केसांमध्ये तेल जमा होत असेल तर, तुम्ही हा शँपू नक्की वापरा. 
(Best herbal shampoo for hair growth)
तेलकट केसांसाठी हा शँपू खूप चांगलं काम करतो. तुमचे केस जर कोरडे असतील तर, हा शँपू वापरू नका कारण यातील शिकाकाई कोरड्या केसांसाठी अजून वाईट ठरू शकते. त्यामुळे या शँपूमुळे केस अजून कोरडे होण्याची शक्यता असते.

केसांच्या पोषणासाठी तुम्हाला प्रोटीन आणि विटामिनची सर्वात जास्त आवश्यकता असते. प्रोटीन आणि विटामिनच्या भरपूर मात्रेमुळे हा शँपू केसांना लवकर वाढ देण्यास मदत होते. सोया प्रोटीनचा आर्क आणि बदामाच्या तेलाने समृद्ध असल्याने केसांच्या मुळापर्यंत जाऊन हा शँपू काम करतो. यामध्ये हळद असून अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक दोन्ही असते. यामुळे हळूहळू केसांतील घाण साफ होते, कोंडाही होत नाही आणि केसांचे मूळ मजबूत होते. याचं वैशिष्ट्य असं आहे की, हा शँपू तेलकट आणि कोरडे अशा दोन्ही केसांसाठी उपयोगी आहे.

तुमचे केस गळण्याची बरीच कारणं असू शकतात. स्कॅल्प इन्फेक्शन, कोरडेपणा, कोंडा इत्यादी कारणं आहेत. तुमचे केसदेखील यापैकी कोणत्याही समस्येचे शिकार असतील तर हा बायोटिकचा प्रोटीन शँपू नक्की वापरून पाहा. यामध्ये लिंबू आणि आवळ्याचे भरपूर गुण आहेत. तुमच्या केसातील घाण साफ हा शँपू करतो आणि तुमचे केस अधिक पोषक बनवण्यसाठी मदत होते. बायोटिकची उत्पादनं ही नैसर्गिक असून केमिकलमुक्त असतात. जी त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे या ब्रँडच्या विश्वासनीयतेबाबत तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. तेलकट आणि कोरड्या दोन्ही केसांसाठी हे उपयुक्त आहेत.

1 टिप्पण्या

If you have any problem you can tell in the comments
I can only post this on the problem you have. Let me just comment

टिप्पणी पोस्ट करा

If you have any problem you can tell in the comments
I can only post this on the problem you have. Let me just comment

थोडे नवीन जरा जुने