Facebook SDK

फुटकुळ्या येणे आलेले मुरूमाचे काळे डाग कश्या प्रकारे घालवावे


Pimoles Problem slove by Healthactive143.blogspot.com
How to Get Rid of Pimples Permanently In Marathi

How to Get Rid of Pimples Permanently In Marathi

 

कडूलिंब
१) कडूलिंबाची निंबोळीचा लगदा चेहर्‍यावर लावल्याने मुरूम कमी होतात.

पुटकुळ्या
१) पुटकुळ्या घालविण्यासाठी कारल्याची साल चेहर्‍यावर चोळावी.
२) यामुळे पुटकुळ्या, काळी वर्तुळे, काळे डाग निघण्यास मदत होईल. हा उपाय साधारणतः तीन ते पाच दिवस करून पाहावा.

लिंबाच्या रस
१) लिंबाच्या रसात गुलाबपाणी, मध आणि ग्लिसरीन समप्रमाणात मिसळून रोज चेहऱ्याला लावल्याने मुरुमे, सुरकुत्या, आणि रखरखीतपणा नाहीसा होतो.

मुलतानी माती
१) मुलतानी माती आणि गुलाब जल यांचा लेप चेहर्‍यावर लावल्यान त्वचा मुलायम राहते. सोबत मुरूम येत नाही

मुरूम
१) पाण्यात भिजलेल्या मुलतानी मातीत थोडीशी जवची कणीक आणि हळद पुड टाकून तयार झालेले मिश्रण आंघोळीपूर्वी चेहर्‍यावर लावल्याने मुरूम कमी होतात व चेहराही खुलतो.


How to Get Rid of Pimples Permanently In Marathi

दही
१) दही किंवा ताकात ओव्याची पुड टाकून त्याचा लेप चेहर्‍यावर लावू काही वेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा. मुरूम जाण्यास फायदा होतो.

मुरुमाची समस्या
१) लिंबाचा रस, तुळशीच्या पानांचा रस, गुलाब पाणी व ग्लिसरीन हे सारख्या प्रमाणात मिसळून एका काचेच्या पात्रात एकत्र करावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्यास मुरुमाची समस्या दूर होते.

हळद, दही व बेसन लेप
१) हळद, दही व बेसन एकत्र करून तयार झालेला लेप चेहर्‍यावर लावावा. एक तासानंतर कोमट पाण्‍याने चेहरा धुवून टाकावा.

दालचिनी
१ ) थोडीशी दालचिनी पेस्ट घेऊन त्यात थोडेसे मध घालावे.
२) हे मिश्रण मुरूमांवर लावून रात्रभर तसेच ठेवावे.
३) दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुऊन टाकावा.
४) असे आठवड्यातून २ ते ३ दिवस सतत केले तर पिंपल्सची समस्या दूर होते.

जायफळ
१) जायफळची बारीक पावडर बनवा.
२) यात योग्य प्रमाणात दूध घालावे.
३) हे मिश्रण चेहऱ्याला व्यवस्थितपणे लावून सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.
४) औषधी गुण असलेले जायफळ आणि दूध यावर चांगले गुणकारी ठरते.



How to Get Rid of Pimples Permanently In Marathi

संत्री
१) संत्र्याची पावडर २ चमचे घेऊन यात लिंबाच्या रसाचे दोन-तीन थेंब आणि भुईमूगाच्या तेलाचे थोडेसे थेंब टाकावेत.
२) ही पेस्ट पिंपल्सवर व्यवस्थित लावावी.
३) आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशाप्रकारे हा लेप चेहऱ्यावर चांगलाच फरक दाखवेल.


लिंबू
१) लिंबाच्या रसाने पिंपल्स कमी होतात. पण, लिंबू चेहऱ्यावर थेट वापरणे योग्य नाही.
२) यामुळे उकळत्या पाण्यामध्ये लिंबाच्या रसाचे थेंब टाकावे.
३) त्यात थोडेसे कापसाचे बोळे टाकावेत.
४) काही वेळानंतर पाण्यातील कापसाचे बोळे काढावेत आणि ते पिंपल्सवर ठेवावेत.
५) यानंतर १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

चेहर्‍यावर मुरूम असल्यास
१) चेहर्‍यावर मुरूम असतील तर तुळस, पुदिना, कडूलिंबाच्या पानाची पेस्ट चेहऱ्याला लावावी.
२) १५ ते २0 मिनिटांनी चेहरा धुवावा.
३) चेहर्‍यावर वेगळी चमक येते.

How to Get Rid of Pimples Permanently In Marathi

पिंपल्स दूर करण्यासाठी
१) त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या आवडत्या तेलात मीठ टाकून स्क्रब करावे.
२) याने पिंपल्स नाहीसे होतील.
३) तुम्ही बदामाचे तेलही वापरू शकता. पाच चमचे बदाम तेल आणि दहा चमचे मीठ मिसळून चेहर्‍यावर स्क्रब करावे.

गुलाबपाणी आणि कापूर
१) गुलाबपाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या.
२) मुरूम जेव्हा होतील, त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहर्‍यावर लावा.

हळद आणि कडुलिंबाची पाने
१) संपूर्ण चेहर्‍यावर मुरूम पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा.
२) त्याने चेहरा स्वच्छ होईल.
३) कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात.

मुरूम घालवा क्षणात
थोडा लिंबाचा रस आणि मध एकत्र करून मुरुमं असलेल्या ठिकाणी लावा... पाच मिनिटांपर्यंत ते चेहऱ्यावर ठेवून चेहरा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून एकदा करू शकता.

अंड्याचा सफेद भाग

१) एका अंड्याचा सफेद भाग वेगळा करून घ्या. यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळून चांगल्या पद्धतीनं एकजीव करून घ्या.
२) हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर पाच ते सात मिनिटे लावा...
३) ते सुकल्यानंतर धुण्याऐवजी पुन्हा एकदा या मिश्रणाचा एक थर लावा... त्यानंतर तिसरा थरही तुम्ही लावू शकता... त्यानंतर कोमट गरम पाण्यानं धुवून घ्या.
४) हा उपाय मुरूम घालवण्यासाठी उपयुक्त आहे.


How to Get Rid of Pimples Permanently In Marathi

चणे आणि लिंबू
१) एका वाटीत चण्याची पावडर घ्या त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून घ्या.
२) त्याची चांगली पेस्ट बनवून पिंपल्स असलेल्या त्वचेवर लावू शकता. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या.
३) त्वचा कोरडी वाटल्यास थोडं माइश्चरायजरचा वापर करू शकता.

मुरूम कमी करण्यासाठी
१) गुलाबाच्या फुलाच्या ताज्या पाकळ्या आणि १० बदाम (छिलून घ्यावे) यांचे मिक्सरमध्ये मिश्रण करून घ्यावे. त्या मिश्रणामध्ये १ चमच्या ग्लिसरीन, एक छोटासा कापराचा तुकडा आणि त्यामध्ये गुलाबजलाचे १० थेंब टाकून ते मिश्रण एकत्र करावे व ते चेहऱ्याला लावावे.
२) त्यामुळे मुरूम कमी होऊन त्याचे दाग कमी होण्यास मदत होते.


गाजर
गाजरमध्ये व्हिटॅमिन 'ए' असते त्यामुळे गाजराचा लेप तोंडावर लावल्यास व्हिटॅमिन 'ए' चा पुरवठा होऊन मुरूम येण्याचे प्रामा कमी होते.

गाजर

एक चमचा नैसर्गिक मध व एक चमचा मैदा यांचे मिश्रण एकत्र करून व ते पाण्याने भिजवून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. ३० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. त्यामुळे मुरुमांची वाढ कमी होऊन चेहरा चांगला होतो

Post a Comment

If you have any problem you can tell in the comments
I can only post this on the problem you have. Let me just comment

थोडे नवीन जरा जुने